कोलकाता येथील इंद्रलाल रॉय यांनी पहिल्या महायुद्धात प्रचंड मोठा विक्रम करुन ठेवला आहे. विशेष म्हणजे रॉयल एअर फोर्समध्ये ते भारतीय वंशाचे एकमेव फायटर पायलट होते. त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल प्रतिष्ठित फ्लाइंग क्रॉस पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय होते. (Indralal roy)
इंद्र यांचा जन्म २ डिसेंबर १८९८ रोजी कोलकोता येथे झाला. ते शहराचे बॅरिस्टर पियारा लाल रॉय आणि लोलिता रॉय यांचे दुसरे पुत्र होते. इंद्र यांचे कुटुंब १९११ मध्ये लंडनला गेले आणि ६७, फिट्झ-जॉर्ज एव्हेन्यू, कॅसिंग्टन येथे राहू लागले. त्यांना रग्बी खेळ खेळायला आवडायचा आणि ते सेंट पॉल स्कूल कॅडेट फोर्समध्ये देखील होते.. ते शालेय जीवनात एक हुशार विद्यार्थी म्हणून लोकप्रिय होते.(Indralal roy)
ब्रिटनच्या रॉयल फ्लाइंग कॉर्प्सच्या वतीने पहिल्या महायुद्धात लढताना इंद्रलाल रॉय यांनी जर्मन वायुसेनेला उद्ध्वस्त केले होते. युद्धात त्यांनी १७० तास उड्डाण केले. त्यावेळी ते केवळ १९ वर्षांचे होते. विशेष म्हणजे १४ दिवसांत त्यांनी ९ फायटर प्लेन पाडून टाकले. इंद्रलाल रॉय यांना त्यांच्या शौर्याबद्दल विशेष फ्लाइंग क्रॉस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. (Indralal roy)
(हेही वाचा :Water Cut : शनिवार आणि रविवारी उपनगरातील काही भागात पाणी बाणी)
युद्धादरम्यान तीन भारतीय वैमानिक हरदित सिंग मलिक, श्रीकृष्ण वेलिंगकर आणि इंद्रलाल राय यांनी युरोपीय देशांच्या आकाशात उड्डाण केले. शत्रूची सुमारे दहा विमाने पाडणारे इंद्रलाल हे एकमेव भारतीय वैमानिक होते. यासाठी त्याला ‘Ace’ म्हणजेच सर्वोत्कृष्ट अशी पदवी मिळाली. पाच किंवा त्याहून अधिक शत्रूची विमाने पाडणाऱ्या फायटर पायलटला ही पदवी दिली जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community