देशातील पहिल्या मतदाराचे निधन; 106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

145

स्वंतत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी (First Indian Voter) यांचे निधन झाले आहे. ते देशातील पहिले मतदार होते. वयाच्या 106 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरवात झाली होती. नेगी यांनी काही दिवसांपूर्वीच आपले शेवटचे मतदानाचे कर्तव्य बजावले होते. हिमाचल प्रदेशच्या( Himachal Pradesh) कल्पा ( Kalpa) गावचे ते रहिवासी होते.

स्वतंत्र भारतातील पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील रहिवासी असलेल्या श्याम सरण नेगी यांनी 2 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतदान केले होते. त्यांनी आयुष्यात 33 वेळा मतदान केले. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.

( हेही वाचा: अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्ज मर्यादेत २५ हजारांवरून १ लाखांपर्यंत वाढ )

1951 मध्ये केले होते पहिले मतदान

देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 साली पार पडली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी सांगायचे. शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचे आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर शनिवारी (आज) सकाळी त्यांचे निधन झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.