मुंबईची लाईफलाईन म्हणजे आपली लोकल ट्रेन. ही लाईफलाईन बंद पडली तर आपलं जगणं किती कठीण आहे हे आपल्याला कोविड काळात कळलंच. मध्यरात्रीचे काही तास सोडले, तर लोकल ही अहोरात्र धावत प्रवाशांना सेवा देत असते.
आता देशातली पहिली लोकल ही मध्य रेल्वेवर धावली हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल. (याबाबत या लिंकवर मिळेल Interesting माहिती: भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
पण ज्या पश्चिम रेल्वेच्या लोकलने दिवसभरात लाखो लोक प्रवास करतात, ती लोकल नेमकी कधी सुरू झाली? या मार्गावर असणाऱ्या स्टेशनची जुनी नावं काय होती?
पश्चिम रेल्वेची पहिली लोकल
12 एप्रिल 1867 या दिवशी पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल ट्रेन धावली. विरार ते बॅकबे स्टेशनदरम्यान या लोकलने आपला पहिला प्रवास केला. Bombay Baroda and Central Indian(BB&CI) या तत्कालीन रेल्वे कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली होती. विरार हे स्टेशन तेव्हाही अस्तित्वात होते, पण बॅकबे स्टेशन हे त्यावेळी चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान बांधण्यात आले होते, जे सध्या अस्तित्वात नाही.
असा होता प्रवास
- या मार्गावर सुरुवातीला विरार ते बॅकबे आणि बॅकबे ते विरार अशी चार डब्यांची दिवसातून एकच लोकल धावत होती.
- 1870 नंतर या लोकलच्या दिवसातून पाच फेऱ्या होऊ लागल्या.
- आश्चर्य म्हणजे कमी प्रतिसादामुळे नंतर ही सेवा पुन्हा एकाच फेरीपर्यंत मर्यादित करण्यात आली.
- विरौर(विरार) स्टेशनवरून सकाळी 6.45 वाजता सुटणारी ही लोकल, संध्याकाळी 5.30 वाजता बॅकबे वरून आपल्या परतीचा प्रवास करायची.
- या प्रवासादरम्यान एकूण 11 स्टेशन्स होती.
- गंमतीचा भाग म्हणजे त्यावेळी या प्रवासाला लागणारा वेळ हा आताच्या विरार ते चर्चगेट प्रवासापेक्षा कमी होता. याचं कारण त्यावेळी प्रवासादरम्यान स्टेशनची संख्या आणि ट्रेनची वर्दळ कमी होती.
काय होती स्टेशनची नावं?
- विरौर(विरार)
- नीला(नालासोपारा)
- बेसिन(वसई)
- पांजो(भाईंदर ते नायगाव दरम्यानचे स्टेशन)
- बेरेवला(बोरिवली)
- पहाडी(गोरेगाव)
- अंदारू(अंधेरी)
- सांताक्रूझ
- बंडोरा(वांद्रे)
- माहीम
- दादूरे(दादर)
- ग्रँट रोड
- बॅकबे(चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान)
(हेही वाचा: 500 च्या ‘या’ नोटा आहेत खोट्या? केंद्र सरकारचा मोठा खुलासा)
(या पहिल्या लोकलचा प्रवास आवडला असेल तर ही लिंक आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनाही या प्रवासाचा आनंद द्या)
Join Our WhatsApp Community