मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७ किमी चा पहिला टप्पा प्रगतीपथावर असून यामध्ये एकुण ६ पुर्णतः उन्नत स्थानके असणार आहेत. मर्गीकेच्या या टप्प्यातील स्थानकांची ६४% स्थापत्य कामे पूर्ण झाली असून, एकूण ७०% इतकी भौतिक प्रगती साध्य करण्यात आली आहे.
कशेळी खाडीवर मेट्रो मर्गिकेच ५०% काम पूर्ण
मेट्रो मार्ग ५ च्या संरेखणात कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. जीच्यावर मेट्रो चा पुल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकुण १३ स्पॅन उभारण्यात येणार असून, सध्यस्थितीत ८ स्पॅन ची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२ मी इतकी असेल.
(हेही वाचा – वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी)
मेट्रो मर्गिका ५ च्या पहील्या टप्प्यात घोडबंदर रोड वरील कापूरबावडी (मेट्रो ४ व ५ चे एकत्रीकृत स्थानक), बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरण पूरक व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच उपनगरीय रेल्वे, बेस्ट/ टीएमसी बस सेवा यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होईल.
“मेट्रो मार्गिका ५ साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपोसाठी जागा निश्चित करण्यात आली असून भूसंपादन आणि निविदा प्रक्रियाचे काम प्रगतीपथावर आहे. या मर्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिज करिता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत, ज्याचे काम लवकरच सुरू होईल”, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
Join Our WhatsApp Community