जगाला सध्या ज्या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटने चिंतेत टाकले आहे. त्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो समोर आला आहे. जगाला पुन्हा एकदा भयाच्या वाटेवर ढकलणा-या या विषाणूचा इटलीच्या विद्यापीठाने फोटो प्रसारित केला आहे. हा नवा विषाणू नेमका कसा दिसतो, तो शरिराच्या नेमक्या कोणत्या अवयवात प्रवेश करतो, कोणते अवयव नष्ट करतो, त्याची लक्षणं कोणती या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी या विषाणूच्या फोटोचा उपयोग केला जाणार आहे. जगावर आलेलं ओमिक्रॅान हे नवं संकट कोणत्या रुपात आहे, हे समजण्यासाठीसुद्धा या फोटोचा उपयोग होणार आहे.
धक्कादायक गोष्टी उघड करणारा फोटो
ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा हा फोटो धक्कादायक गोष्टी उघड करणारा आहे. बहुतांश म्युटेशन्स हे मानवी पेशींशी संवाद होणाऱ्या भागात सापडले आहेत. त्यामुळे शरीर त्यांना कसा प्रतिसाद देतं किंवा शरीराच्या इतर कुठल्या भागात कोरोनाचा हा विषाणू कसा प्रभाव टाकतो याचा अभ्यास अजून होणं बाकी आहे. पण ह्या फोटोमुळे त्याच्या अभ्यासाला चालना मिळणार आहे. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकॉंगमध्ये जे ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत त्यांच्या अभ्यासाअंती हा फोटो तयार करण्यात आला आहे.
( हेही वाचा : हिंदू धर्माची खिल्ली उडवणारा मुनावर फारुखी पुन्हा का होतेय ट्रेंड? )
Join Our WhatsApp Community