शेअर बाजारातील तेजीला मोठा ब्रेक! सेन्सेक्स 475 तर निफ्टी 133 अंकांनी घसरला

97

गेल्या दोन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजारात बुधवारी दिवसाच्या सुरुवातीलाच पहिल्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून त्यामुळे ही घसरण झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण

भारतीय बाजारात दिवसाच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये 475 अंकांची घसरण दिसून आली, तर निफ्टीमध्येही 133 अंकांची घसरण झाली आहे. तर सेन्सेक्समध्ये आज 0.78 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,095 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,937 अंकांवर सुरू झाला आहे. अमेरिकेत महागाई वाढल्याने शेअर बाजारात घसरण झाली होती.त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला आहे.

(हेही वाचा – गुजरातमध्ये २०० कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त, ६ जणांना अटक)

दिवसभर अशी असणार शेअर बाजारातील स्थिती

तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने 18000 चा शॉर्ट टर्म रझिस्टेंस तोडत त्याच्या वर बंद होण्यात यश मिळवल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान म्हणाले. निर्देशांकाने डेली आणि इंट्राडे चार्ट्सवर एक अपट्रेंड कंन्टीन्यूएशन फॉर्मेशनमध्ये सातत्य दाखवले आहे. जे सध्याच्या पातळीपेक्षा आणखी वाढीचे लक्षण आहे. आता निफ्टीला 18,000 आणि 17,925 वर सपोर्ट दिसत आहे. तर 18,150 ते 18,200 वर रझिस्टन्स दिसत आहे. जर निफ्टी 17,925 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 17,850 ते 17,800 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.