आधी होते सैनिक, नंतर झाले प्रसिद्ध संगीतकार : Madan Mohan

99
आधी होते सैनिक, नंतर झाले प्रसिद्ध संगीतकार : Madan Mohan

मदन मोहन (Madan Mohan) हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली असे होते. तरुणपणी ते सैनिक होते. नंतर त्यांचा संगीताकडे कल असल्याने ते ऑल इंडिया रेडिओमध्ये रुजू झाले. १९४३ मध्ये त्यांनी सेकंड लेफ्टनंट म्हणून ते सैन्यात भरती झाले. मात्र पुढे त्यांना संगीतात रस वाटू लागला. त्यानंतर ते ऑल इंडिया रेडिओमध्ये रुजू झाले. (Madan Mohan)

पुढे चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांनी अप्रतिम गाणी रचली. मोहम्मद रफी हे त्यांचे आवडते गायक होते. ऋषी कपूर आणि रणजीता यांचा लैला मजनू हा चित्रपट बनत असताना गायक म्हणून किशोर कुमार यांचे नाव पुढे आले, पण मदन मोहन यांनी स्पष्टपणे सांगितले की, पडद्यावरचा मजनूचा आवाज रफी साहेबांचाच असेल. या चित्रपटामुळे रफी साहेब हे अभिनेते ऋषी कपूर यांचाही आवाज बनले. (Madan Mohan)

(हेही वाचा – Lok Sabha Oath Ceremony : ‘या’ नेत्यांनी घेतली मायबोलीतून शपथ)

मदन मोहन यांनी तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्यासोबत अनेक सुंदर गझल रचल्या. आपकी नजर ने समझा, , आगर मुझे मोहब्बत है यांसारख्या रचना प्रचंड गाजल्या. त्यांच्या संगीतात इतकी जादू होती की २००४ मध्ये वीर झारा या चित्रपटासाठी त्यांचे न वापरलेले संगीत वापरले गेले. जावेद अख्तर यांनी गीते लिहिली आहेत. फिर ये हंसी रात हो ना हो आणि तुम जो मिल गये हो यांसारखी कालातीत गाणी देणारे अत्यंत प्रतिभावान संगीतकार मदन मोहन यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. (Madan Mohan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.