पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शिल्पकाराने साकारले पाच फुटी वाळूचे शिल्प; पहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ओडिशातील पुरी बीचवर नरेंद्र मोदींचे पाच फूटाचे वाळूचे शिल्प बनवले आहे. यासाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळूचा वापर केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा जीवनप्रवास दाखविण्यासाठी १ हजार २१३ मातीच्या चहाच्या कपांचाही यात वापर केला आहे.

सुदर्शन पटनायक हे त्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते नेहमीच वाळूचा वापर करुन वेगवेगळे शिल्प साकारतात. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत विविध बक्षिसेही जिंकली आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here