पाणी टंचाईने घेतले ५ बळी, डोंबिवलीतील दुर्देवी घटना

डोंबिवलीतील काही गावामध्ये पाणी टंचाईने जनता हैराण झालेली आहे, या पाणी टंचाईमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना जीवाला मुकावे लागल्याची घटना शनिवारी घडली आहे. पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड (55), मयुरेश गायकवाड (15), मोक्ष गायकवाड (13) निलेश गायकवाड (15) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. गायकवाड कुटुंब पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी शनिवारी संदप गावातील खदानीवर आले होते. त्या ठिकाणी कपडे धुवत असताना मुले खदानीतील पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू 2 लागले, त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी खदानीत उड्या टाकल्या, त्यात पाच जण बुडाले.

(हेही वाचा – “असली आ रहा है, नकली से सावधान!”, राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेची पोस्टर बाजी)

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र दुर्दैवाने पाचही जणांचा त्यात बुडून मृत्यु झाला. अग्निशमन दलाने पाचही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून पोलिसांनी पाचही मृतदेहाचा पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. याघटनेने देसले पाडा गावात शोकाकुल वातातवरन पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here