शाळकरी मुलांच्या परीक्षा संपल्या की, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण फिरायला जातात. यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी विशेष 5 एक्सप्रेस सोडल्या आहेत. पुणे-जयपूर, पुणे-करमळी, मुंबई-शालिमार, नागपूर-मडगाव, पनवेल-करमळी या विशेष एक्स्प्रेसच्या एकूण 96 फेऱ्या होणार आहेत.
- मुंबई ते शालिमार (20 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01019 एलटीटी येथून 12 एप्रिल ते 14 जूनपर्यंत दर मंगळवारी रात्री 8.15 वाजता सुटणार आहे आणि शालिमार येथे तिस-या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, रुरकेला, चक्रधरपूर, टाटा नगर, खडगपूर, संत्रागाछी.
- पनवेल ते करमळी (18 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01405 पनवेल येथून 9 एप्रिल ते 4 जूनपर्यंत दर शनिवारी रात्री 11 वाजता सुटेल आणि करमाळी येथे दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01406 विशेष गाडी 9 एप्रिल ते 4 जूनपर्यंत दर शनिवारी सकाळी 9.20 वाजता करमाळी येथून सुटेल.
- पुणे ते जयपूर (20 फेऱ्या)
पूर्णत: एसी सुपरफास्ट असलेली गाडी क्रमांक 01401 विशेष गाडी 12 एप्रिल ते 14 जूनपर्यंत दर मंगळवारी पुणे येथून रात्री 12.30 वाजता सुटेल आणि जयपूरला त्याच दिवशी रात्री 11.10 वाजता पोहोचेल.
– परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01402 विशेष गाडी जयपूर येथून 13 एप्रिल ते 15 जूनपर्यंत दर बुधवारी रात्री 12.35 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.
( हेही वाचा: राज्यातील 36 टक्के कुटुंबे कर्जबाजारी! वाचा काय सांगतो आर्थिक पाहणी अहवाल? )
- नागपूर ते मडगाव (20 फेऱ्या)
– गाडी क्रमांक 01201 विशेष गाडी 9 एप्रिल ते 11 जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01202 विशेष गाडी 10 एप्रिल ते 12 जूनपर्यंत पर्यंत दर रविवारी रात्री 8.15 वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
- पुणे ते करमळी (18 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01403 विशेष गाडी 8 एप्रिल ते 3 जूनपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल.
– परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01404 विशेष गाडी 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर रविवारी करमळी येथून सकाळी 9.20 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 11.35 वाजता पोहोचेल.