पुण्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला 1 जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी देशभरातून हजारो नागरिक येत असतात. या दिवशी विजय स्तंभ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दल 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करणार आहे. या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली.
विविध भागातील पोलीस बंदोबस्तासाठी पुण्यात
बंदोबस्तासाठी राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयातून हे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील पोलीस बंदोबस्त पुण्यात दाखल झाला आहे, अशी माहिती विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. आज या सर्व पोलिसांना बंदोबस्त बाबत माहिती दिली जाणार असून त्यानंतर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – कोरोनाची धास्ती कायम! मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी)
पाच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात
या बंदोबस्तामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, 13 सहाय्यक आयुक्त, 53 पोलीस निरीक्षक, 130 सहाय्यक निरीक्षक, 1950 अंमलदार, 700 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या, दहा बॉम्बशोधक व नाशक पथक, 6 जलद कृती दलाचे पथके, 5 दंगल नियंत्रक पथके असा बंदोबस्त यांच्यासह तब्बल पाच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community