एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने Unseasonal rain हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट राहणार आहे. तर दुसरीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे.
(हेही वाचा – Unseasonal rain : पुढील पाच दिवस पावसाचे)
विदर्भात यंदा अवकाळी पावसामुळे Unseasonal rain चक्क उन्हाळय़ात नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस सुरू आहे. वाशीमसह यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हेही पहा –
या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज व यलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community