कांदिवलीतील लालजीपाडा, जनता कॉलनी, एकता नगरमधील पूरपरिस्थिती होणार दूर!

129

कांदिवली पश्चिम येथील एस.व्ही.रोडवरील कमला नेहरु नाला आणि पोयसर नदीपर्यंतच्या भागात मागील अनेक वर्षांपासून पाणी साचले जात असून यामुळे या भागातील एस.व्ही. रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. प्रत्येक पावसाळ्यात कांदिवलीतील लालजी पाडा,एकता नगर, जनता कॉलनी, अभिलाष नगर आदी भागातील पूरपरिस्थितीला कारणीभूत असलेल्या या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास करावा लागणार आहे. यासाठी एस.व्ही. रोडपर्यंतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले जात आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करण्याचा निर्णय

कांदिवलीतील कमला नेहरु नाला ते पोयसर नदीपर्यंतच्या एस.व्ही.रोडवरील परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. याबाबत तत्कालिन स्थानिक भाजपच्या प्रियंका मोरे आणि भाजपचे तत्कालिन स्थायी समिती सदस्य कमलेश यादव यांनी या तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करत आवाज उठवला होता.

महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचयावतीने केलेल्या पाहणीमध्ये एस.व्ही. रोडवरील कमला नेहरु नाला ते पोयसर नदीपर्यंतच्या जलवाहिन्यांची रुंदी व खोली अपुरी असल्यामुळे रस्त्यांवर पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे कमला नेहरुन नाला ते पोयसर नदीपर्यंतच्या एस.व्ही. रोडवरील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याचे रुंदीकरण केल्यास येथील पाण्याचा निचरा जलदगतीने होऊन ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असून त्यादृष्टीकोनातून यासाठी निविदा मागवण्यात आली कमला नेहरुन नाला ते पोयसर नदीपर्यंतच्या एस.व्ही. रोडवरील रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : विमान प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ आली धावून… )

एकूण एकूण २१८० मिटर्स लांबीच्या नाल्यांचे काम केले जाणार असून यासाठीच्या कामांकरता हर्षिल एंटरप्रायझेस कंपनी पात्र ठरला. यावर ६ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या कंत्राट रकमेपेक्षा उणे ३० टक्के दराने कमी दराने ही कामे कंत्राटदाराने मिळवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.