अमेरिकेने चक्क आरटीपीसीआर चाचण्या केल्या बंंद! कारण वाचून व्हाल थक्क

जग मागच्या दोन वर्षांपासून ज्या महामारीशी झुंजत आहे, जग मृत्यूच्या सावटाखाली आहे, ज्यामुळे लाखो लोक प्राणांना मुकले आहेत. त्यातच आता ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मात्र कोरोनाबाबत अमेरिकेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या ज्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या गेल्या, त्या सदोष आहेत. सामान्य फ्लू झालेल्या लोकांनाही कोविड झाला म्हणून या आरटीपीसीआर चाचणीतून दाखवण्यात आले, त्यामुळे रुग्ण संख्या वाढली, त्यामुळे सामान्य फ्लू असणा-या लोकांनाही कोविड झाला म्हणून औषधोपचार केला जातो. म्हणूनच, नव वर्षात आम्ही आरटीपीसीआर चाचणी बंद करणार आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

क्वारंटाईननंतरही १२ आठवडे पॉझिटीव्ह 

याबाबतचे धक्कादायक खुलासे अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्र (सेंटर्स फाॅर डिजिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन) च्या संचालक वॅलेन्सी यांनी केले आहेत. कोरोना झाल्यानंतर क्वारंटाईनचा काळ संपल्यावर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही संचालक वॅलेन्सी यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, आरटीपीसीआर चाचणी आवश्यक नाही कारण आरटीपीसीआर चाचणी ही 12 आठवड्यांपर्यंत सकारात्मक राहू शकते. आरटीपीसीआर चाचण्या सदोष असल्याचे आम्हाला सुरुवातीपासूनच माहिती होते. परंतु, या चाचण्यांचा वापर अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि ट्रम्प यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी करण्यात आल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

आरटीपीसीआर चाचण्या सदोष

आरटीपीसीआर चाचण्या या सदोष आहेत. या चाचण्या सामान्य फ्लू आणि कोविड यात फरक करत नाहीत, आरटीपीसीआर चाचणी ही नाॅर्मल फ्लू झालेल्या लोकांनाही कोविड असल्याचे निदान करते. त्यामुळे सामान्य फ्लू असणा-या लोकांनाही कोविड झाला म्हणून औषधोपचार केला जातो. म्हणूनच, नव वर्षात आम्ही आरटीपीसीआर चाचणी बंद करणार असल्याचे वॅलेन्सी यांनी यावेळी सांगितले. आरटीपीसीआर चाचण्या या सदोष आहेत तसेच त्या सामान्य फ्लू आणि कोविडमध्ये फरक करत नाहीत हे आम्हाला तेव्हा समजलं जेव्हा 2020 मध्ये अमेरिकेतून सामान्य फ्लू झालेल्या लोकांची संख्या जवळजवळ नगण्य होती.

( हेही वाचा: प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका…’! )

म्हणून रुग्णसंख्या वाढली

गुड माॅर्निंग अमेरिका या कार्यक्रमात बोलताना, वॅलेन्सी शेवटी म्हणाल्या की, मागच्या दोन वर्षांपासून आम्ही याचा अभ्यास करीत आहोत, त्यानुसार आरटीपीसीआरच्या सदोष चाचण्या आणि ब-याच काळासाठी क्वारंटाईन केल्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणून, आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की, संसर्गानंतर आरटीपीसीार चाचण्या सकारात्मक राहतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here