राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासन पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन पथकाकडून पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे.आरएस डेअरी फार्म या विनापरवाना कारखान्यात छापा मारला आहे. यावेळी कारखान्यात बनावट पनीर बनवत असल्याचे आढळून आल्याने पथकाकडून कारवाई करण्यात आली. तर भेसळयुक्त पनीर आणि दूध पावडरचा मोठा साठा जप्त केला आहे.
(हेही वाचा – अबकारी घोटाळ्याप्रकरणी ED कडून मुंबई, दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी छापे)
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरली जाणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडरही जप्त केली आहे.
यासोबत, 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो बी डी पामोलीन तेल असा एकूण सर्व 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा पथकाने जप्त केला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा पथकाने जागेवरच नष्ट केला आहे. तसेच या बनावट पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेडे पाठवण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community