महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येते. ६ डिसेंबर २०२२ रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून यंदासाठी तयार करण्यात आलेल्या या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. तसेच या सर्व अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली असून याचे वितरणही सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन मंगळवारी ६ डिसेंबर, २०२२ रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याची, तसेच महापरिनिर्वाण दिन तयारीबाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयातून या पुस्तिकेचे मुद्रण करण्यात आले आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या हस्ते दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात सोमवारी करण्यात आले.
पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त आयुक्त श्री. शर्मा यांच्या हस्ते दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला. मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या अन्न वितरणाचीही सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्यासह महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे, भिकाजी कांबळे, प्रकाश जाधव यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती संकलित असलेल्या या पुस्तिकेचे विनामूल्य वितरण अनुयायांना करण्यात येते. या माहिती पुस्तिकेची संगणकीय प्रत महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.inया संकेतस्थळावर असणा-या ‘अंतरंग आणि अहवाल’ या सदराखाली ई-पुस्तके या विभागामध्ये उपलब्ध आहे.
( हेही वाचा: राज्यातील अंगणवाड्यांचे प्राथमिक शाळेत विलीनीकरण होणार? )
पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण समाज माध्यमांवर
दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येऊ न शकणा-या अनुयायांना मंगळवारी महापरिनिर्वाण दिनी ( ६ डिसेंबर, २०२२ रोजी) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरुन करण्यात येणार आहे. सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या समाज माध्यम खात्यांद्वारे करण्यात येणार आहे.
हे प्रक्षेपण पुढील लिंकवर उपलब्ध असणार आहे:-
ट्विटर :-
युट्युब:-
फेसबूक:-
Join Our WhatsApp Community