पान हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. आपल्याकडे शुभकार्यात विडा देण्याची प्रथा आहे. एखादं आव्हान स्वीकारलं की आपण विडा उचलला असं म्हणतो. पान खाण्याचे काही शारीरिक फायदे असतात असंही म्हटलं जातं. आपल्या भारतात ठिकठिकाणी पानपट्टी आढळून येते.
अर्थात अनेक लोक तंबाखू असलेलं पान खातात, परंतु आपल्या संस्कृतीत जे पान खायला सांगितलंय, त्यात तंबाखूचा समावेश नाही. आता तुम्ही म्हणाल, मधेच हे पान-पुराण कुठून सुरु झालं? सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हे आजोबा गेली ४९ वर्षे आयुर्वेदिक पान विकत असल्याचा दावा करत आहेत.
आधी ऑर्डर द्यावी लागते
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक आजोबा १९७४ पासून आयुर्वेदिक पान विकत आहेत. त्यांना संजू पानवाला म्हणतात. त्यांचा असा दावा आहे की हे पान अनेक रोगांवर परिणामकारक आहे. त्यासाठी आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. महत्वाचं म्हणजे इथे सगळीकडे आढळून येणारं सामान्य पान मिळत नाही. तसेच या दुकानात सिगरेट व इतर तंबाखूजन्य पान मिळत नाही. तर इथे खास आयुर्वेदिक पान मिळतं.
व्हिडिओ लिंक: https://www.kooapp.com/koo/
उत्तर प्रदेशातील संजू पानवाला
दुकानदाराचं म्हणणं आहे की या पानात औषधी गुण असून हे आयुर्वेदिक पान आहे. यामध्ये विविध प्रकारच्या २५ वनस्पती आणि मसाले देखील टाकले जातात. पाठदुखी, तोंड येणे इ. अनेक रोगांसाठी हे पान उपयुक्त असल्याचा दावा दुकानदार करतात. १९७४ पासून ते हा व्यवसाय करत आहेत. महत्वाची बाब अशी की, अनेक अधिकारी आणि स्थानिक नेते हे त्यांचे रोजचे ग्राहक आहेत. तुम्ही कधी उत्तर प्रदेशात गेलात तर संजू पानवाल्याच्या दुकानाला नक्की भेट द्या.
Join Our WhatsApp Community