बिबट्याच्या कातडीची विक्री रोखली, चार आरोपी ताब्यात

133

विदर्भात बिबट्याच्या कातडीची अवैधरित्या विक्री होत असल्याची टीप मिळताच नागपूर आणि वर्धा वनविभागाने मिळून चोरांना रंगेहाथ पकडले. बिबट्याच्या कातडीसह चार आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. बिबट्याची कातडी वर्धा येथील खासगी बसस्थानकाच्या डेपोजवळ विकली जात असल्याची टीम खब-यांकडून वनविभागाला मिळाली होती.

वनविभागाकडून चार आरोपी ताब्यात

बाबासाहेब आंबेडकर खासगी बस स्टॅण्डजवळील आंबेडकर बगीच्याजवळ विक्री सुरु असतानाच वनविभागाने चार आरोपींना ताब्यात घेतले. इस्लामपूरा येथील वकील अहमद शेख, चंद्रपूर येथील दिलीप कुळसंगे, विनायक मडावी आणि वर्ध्यातच राहणारा महेंद्र अत्राम असे या चार आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींचे मोबाईल आणि बिबट्याची कातडी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतली. या प्रकरणात अजून काही आरोपी फरार असल्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

वनविभागाचे पथक 

नागपूर वनविभागाचे (प्रादेशिक) चे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा.वर्धा वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, विभागीय वनाधिकारी (दक्षता) पि.जी. कोडापे, नागपूर वनविभागाचे विशेष पथकातील उमरेडचे साहाय्यक वनसंरक्षक (जंकास-२) एन. जी. चांदेवार, रामटेकचे साहाय्यक वनसंरक्षक (जंकास-१) संदिप गिरी, वर्ध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.खेडकर, बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी (दक्षता) सोनावणे, बुटीबोरी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक विनोद शेंडे, गणेश जाधव, दिनेश पडवळ, निलेश टवळे, सुधीर कुलरकर यांनी ही कारवाई केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.