बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आरेला लागून असलेल्या साईबंगोडा भागाीतल अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर वनविभागाला आजचा मुहूर्त मिळाला. आज शुक्रवारी दिवसभरात साईबंगोडा भागांतील झोपडपट्ट्या तोडण्यासाठी वनविभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाईला सुरुवात केली, या भागांत अवैधरित्या दारुभट्ट्या चालवल्या जात असल्याचीही प्रकरणे याअगोदर समोर आली आहेत.
कोरोनानंतर पहिल्यांदाच कारवाई
कोरोनाच्या आगमनानंतर पहिल्यांदाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने अतिक्रमणाच्या कारवाईला सुरुवात केली. या कारवाईसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार तयारी सुरु होती. याअगोदरही वनविभागाने साईबंगोड्यात कारवाईला सुरुवात केली असता तिथल्या महिलांनी वनाधिका-यांवर विनयभंगाचा आरोप लावत कारवाई थांबवण्याची योजना आखली. मात्र यंदा वनविभागाकडून मोठ्या संख्येने महिला वनाधिका-यांचा भरणा कारवाईत सामील करण्यात आला.
(हेही वाचा – पुण्यात सर्वांचा चोख हिशोब होणार, ‘मनसे’चा इशारा!)
अतिक्रमणे हटवण्यासाठी मोठी टीम
अंदाजे ४०० वनाधिकारी आणि ३०० पोलिसांच्या तुकडीसह तब्बल ७०० अधिका-यांकडून साईबंगोड्यातील अतिक्रमणे हटवली जात आहे.
Join Our WhatsApp Community