नागाला विहिरीतून पकडून कुंकू वाहिले…सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल होताच वनविभागाने धारेवर धरले

राज्यात मंगळवारी, २ आॅगस्ट रोजी नागपंचमीनिमित्ताने विहिरीतून नाग चोरून त्याला दूध तसेच कुंकू वाहण्याचा प्रकार सांगलीत घडला. ही घटना सोशल मिडीयावर व्हायरल होताच वनविभाग पूर्णपणे अॅक्शन मोडवर आले. याप्रकरणी आरोपीला किमान पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावून सात वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्याच्या तयारीत वनविभाग आहे.
सांगलीतील मिरज येथे हा प्रकार घडला. मिरजमधील महादेव मंदिरात सोमवारी सकाळपासून भक्त महिला व पुरुष नागाला कुंकू तसेच दूध देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. नागाला काठीने पकडून त्याची हालचाल नियंत्रणात ठेवली जात असल्याचे पाहत महिला व पुरुष नागाच्या जवळच जाऊन पूजा अर्चा करत होते. याबाबतचे दोन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने ही घटना तातडीने रोखली.

रात्रभर नागाला मंदिरात बंद केले

चौकशीअंती नागाला पकडून आणणा-या आरोपी बसप्पा माळीने मंदिराच्या नजीकच्या विहिरीतून आदल्या रात्री नाग पकडल्याची माहिती वनविभागाला दिली. नागाला पकडून त्याने रात्रभर मंदिरातच डांबून ठेवले. सकाळी भक्तांची गर्दी होताच त्याला मंदिराच्या आवारात पूजेसाठी बाहेर काढले. त्यावेळी काही जणांनी हा प्रकार मोबाईलच्या व्हिडिओत बंद केला. व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकवर व्हिडिओ अपलोड होताच याबाबतची माहिती वनविभागाला मिळाली.

साप किंवा नागाला पकडणे हा वन गुन्हा

साप किंवा नागाची अवैध तस्करी करणे, विक्री तसेच सार्वजनिक प्रदर्शन करणे हा वन गुन्हा ठरतो. दोन्ही सरपटणा-या प्रजाती भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार संरक्षित आहेत. किमान २५ हजारांचा दंड तसेच सात वर्ष तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here