अस्वलाचे पिल्लू मध खायला गेले आणि दगडांमध्ये अडकले!

139

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलाला लागून असलेल्या खकनार वनपरिक्षेत्रातील जंगलात मध खाण्यासाठी एक अस्वल व तिच्या पिल्लाने मधामाशांच्या पोळ्यावर हल्ला केला. यावेळी अस्वल मध खावून निघून गेले; मात्र लहान अस्वलाचे पिल्लू दोन दगडांमध्ये फसल्याची घटना घडली. अखेर वनविभागाने घटनास्थळी रेस्क्यू केले व फसलेल्या अस्वलाच्या त्या पिल्ल्याला सुखरूप काढून जंगलात सोडले. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त करून वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

काय आहे घटना

धारणीपासून ५० कि. मी. अंतरावरील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार रेंजमधील नावथा नावाच्या जंगलात एका ठिकाणी मधमाशीचे मोठे पोळ होते. जंगलातील अस्वलाने ते पाहील्यानंतर मध खाण्यासाठी पिल्लाला घेऊन गेले. मधाचा पोळ तोडून खाणे सुरू केले. यावेळी मधमाश्या इकडून तिकडे सैरावैरा पळू लागल्या तेव्हा अस्वलाचे पिल्लाु आपल्या बचावासाठी दोन मोठ्या दगडांच्यामध्ये गेले आणि तिथे अडकून राहिले.

(हेही वाचा – मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाला पवारांचाच विरोध!)

मधमाशीच्या आक्रमणापासून तो बचावला मात्र…

मधमाशीच्या आक्रमणापासून ते पिल्लु बचावले मात्र, दगडामधून बाहेर निघणे त्याला शक्य झाले नाही. ते जोराने ओरडू लागले. मात्र तेथे उपस्थित लोकांनी भितीने तेथून पळ काढला. पिल्लाची धडपड पाहून काही जणांनी नावथा व खकनार वन विभागाला माहिती दिली. तत्काळ रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले. वनविभागाद्वारे अस्वलच्या पिल्लाची सुटका करणाऱ्या खकनार रेंजर सचिन सिंग व डिप्टी रेंजर, वनरक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.