भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती, अशी ख्याती असलेल्या माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांनी लहानग्यांसाठी पुस्तकरूपी खजिना आणला आहे. लीना मेहेंदळे यांचे ‘भो ढब्बूजे’ हे पुस्तक लहान मुलांच्या भेटीला आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने ते वाचकस्नेही झाले आहे.
लहान मुलांना पुस्तकांचे आकर्षण असते. पाने उलटणे, चित्रे पाहण्यात ते गुंतून जातात. पालक त्यांच्यासोबत वाचत असतील, तर मुलेही पुढे चांगले वाचक होतात. ही बाब ध्यानात घेऊन लीना मेहेंदळे यांनी उत्तम असे संस्कृत बालसाहित्य पुढे आणण्याचा निर्धार केला होता. तो आता पूर्णत्वास आला आहे.
‘कौशलम् न्यासा’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात संस्कृत कवितेचे तितकेच गेय मराठी भाषांतर देण्यात आले आहे. शिवाय ‘क्यू आर’ कोडवर त्या त्या पानाची कविता संस्कृत आणि हिंदीतून ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मराठी भाषांतराला तीच चाल लावण्याची संधी बाल वाचकांना देण्यात आली आहे.
(हेही वाचा – E-Panchnama: येत्या जूनपासून राज्यात ई-पंचनामे होणार; सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार)
Join Our WhatsApp Community