काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मोदी यांना मारू शकतो’ असे विधान केल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तर नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक होताना दिसतेय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन देखील केले जात आहे. नाना पटोलेंविरोधात नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशातच आता या राजकीय वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस
अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंवर निशाणा साधल्याचे दिसतेय. त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेल्या कामाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. अमृता फडणवीसांनी हिंदीत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलेय, ‘सूरज को डूबाने का इरादा रखते है कुध नन्हे पटोले! पर इल्म नही है उन्हें के इस प्रगती की रोशनी को बुझाने की होड मे, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले’.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !
पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! #ModiHaiToMumkinHai #modiJiJiyoHazaroSaal @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/y4JLNyrmho— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 18, 2022
या ट्विटमध्ये अमृता फडणवीसांनी मोदींना सूर्याची उपमा दिली आहे. ‘काही लहान पटोळे सूर्याला बुडवण्याचा बेत आखत आहेत. परंतु त्यांना माहिती नाही की, या प्रगतीच्या तेजाला विझवण्याच्या नादात ते स्वत:लाच जाळून टाकतील’, असा निशाणा अमृता फडणवीसांनी नाना पटोलेंवर साधला आहे.
(हेही वाचा – पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना अटक करा; गडकरी आक्रमक)
काय म्हणाले होते पटोले
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.