पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. एका रॅलीदरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्यासह 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
इम्रान खान यांची रॅली
तहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानात सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी आझादी मोर्चा काढला आहे. या मोर्च्यात इम्रान खान हे सरकारवर निशाणा साधण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. याचसाठी इम्रान खान यांनी गुरुवारी वजिराबाद येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत इम्रान खान आणि त्यांचे कार्यक्रर्ते निदर्शने देखील करत होते.
इम्रान खान जखमी
दरम्यान, ही रॅली सुरू असतानाच इम्रान खान यांचा ताफा गुजरानवाला परिसरातील जफर अली खान चौकात आली असताना इम्रान खान यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये कार्यकर्त्यांसह इम्रान खान देखील जखमी झाले आहेत. तसेच माजी राज्यपाल अमरान इस्मेल हे देखील या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून इम्रान खान यांच्यासह जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community