पाकिस्तानचे होणार तीन तुकडे? असे असतील नवे प्रांत

98

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे तीन तुकडे होणार असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे तुकडे झाल्यास त्यास विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाक लष्करप्रमुख कमर बाजवा जबाबदार असतील, असे इम्रान खान म्हणाले.

काय म्हणाले इम्रान?

  • शाहबाज शरीफ सत्तेत आल्यापासून सातत्याने महागाई वाढत असून शेअर बाजारही कोसळत आहे.
  • परकीय कर्जाचे प्रमाण खूप असल्याने दिवाळखोरीच्या मार्गावर पाकिस्तान निघाला आहे.
  • पाकिस्तान दिवाळखोरीत निघाल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम लष्करावर होऊन लष्कर सैरभैर होईल.

तीन तुकडे कोणते?

  • पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
  • हे तीनही प्रांत पाकिस्तानातून फुटून निघू शकतात, असा दावा इम्रान यांनी केला आहे.
  • तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील थिंक टॅंकनीही ही शक्यता बोलून दाखवली आहे.

( हेही वाचा: पेन्शन थकबाकी उशीरा मागितली म्हणून नाकारता येणार नाही; सर्वोच्च न्यायालय )

का होणार तुकडे?

  • पाकिस्तान सरकारमध्ये प्रामुख्याने पंजाबी लाॅबीचे प्राबल्य असते.
  • लष्करातही याच लाॅबीचा वरचष्मा आहे. त्यामुळे उर्वरित प्रांतांना डावलले गेल्याची खंत असते.
  • आर्थिकदृष्ट्याही या प्रांतांवर अन्याय होत आला आहे.
  • गेल्या अनेक वर्षांपासून हे असे होत आले असल्याने अस्वस्थता वाढली आहे.
  • तीनही प्रांतांतील लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.