मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंची ईडी कार्यालयात 7 तास चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मंगळवारी, ५ जुलै रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांचा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत जबाब नोंदवला. विशेष म्हणजे पांडे हे रिक्षाने ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची ईडी कार्यालयात ७ तास चौकशी करण्यात आली.

अडीच तास केली चौकशी 

१ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते. 1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पांडे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय पांडे मंगळवारी सकाळी 11.20 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सकाळपासून मीडिया त्यांना या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी उभा होता. पांडे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी सुट्टी देण्यात आली. यादरम्यान ईडीने पांडे यांचा जबाब नोंदवला. पांडे यांची ईडीची चौकशी आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या कामकाजाशी संबंधित आहे. आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, इतर काही कंपन्यांपैकी एक, कथित को-लोकेशन अनियमिततेनंतर NSE चे सुरक्षा ऑडिट केले होते. मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here