Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

218

भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झालं आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शेखावत यांनी शुक्रवारी सकाळी ९.३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देवीसिंह शेखावत आजारी होते. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे शेखावत यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण वयोमानामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, प्रकृती आधिकाधिक खालावत चालली होती. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान शेखावत यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहित मिळत आहे.

शेखावत हे शिक्षण क्षेत्रात, राजकारणात आणि सामाजिक कार्यात खूप सक्रिय होते. सुरुवातीच्या काळात शेखावत रसायन शास्त्राचे प्राध्यापक होते. १९७२ साली त्यांनी मुंबई विद्यापिठातून पीएचडी केली होती. राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून त्यांनी केली होती. अमरावतीच्या महापौर ते आमदार असे आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. प्रतिभाताई पाटील आणि देवीसिंह शेखावत यांचा विवाह ७ जुलै १९६५ रोजी झाला होता. यावेळी देवीसिंह शेखावत अमरावतीचे महापौर होते. पण १९९५ साली त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते.

(हेही वाचा – भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्युझियम उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.