माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन झाले आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या मुलीने ट्टवीट करत याबाबतची माहिती दिलीआहे. ‘पापा नहीं रहें’ , असे ट्वीट शरद यादव यांच्या मुलीने केले आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
तीन राज्यांमधून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येणारे पहिले राजकारणी
शरद यादव हे मध्यप्रदेशातील जबलपूरमधील दोनदा आणि उत्तर प्रदेशातील बुदौनमधून एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. यादव हे देशातील पहिले असे राजकारणी होते की, जे तीन राज्यांमधून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. 2013 साली त्यांनी पक्ष एनडीमधून बाहेर पडल्यावर संजोयजकपदाचा राजीनामा दिला होता.
पापा नहीं रहे 😭
— Subhashini Sharad Yadav (@SubhashiniSY) January 12, 2023
( हेही वाचा: उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नक्की झाले कधी? निवडणूक आयोग विचारू शकतो अडचणींचे प्रश्न )
शेतकरी ते यशस्वी राजकारणी असा प्रवास
1 जुलै 1947 ला मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे बंदाई गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. विद्यार्थी राजकारणातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये छाप पाडत बिहारच्या राजकारणात मोठे नाव कमावले. यादव यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यश मिळवले.
Join Our WhatsApp Community