अमेरिकेचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेले बराक ओबामा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहिलेय की, मी कोरोना पाॅडिटिव्ह आढळलो आहे. काही दिवसांपासून माझा घसा दुखत होता, पण आता मी बरा आहे, असं म्हणत त्यांनी कोरोना पाॅजिटिव्ह असल्याचं सांगितलं.
लसीकरण करुन घ्या
बराक ओबामा यांनी पुढे लिहिले की, मिशेल आणि मी लस घेतली होती. मिशेलची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच ट्विटमध्ये त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. बराक ओबामा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, जर तुम्ही लसीकरण केले नसेल, तर लवकरात लवकर करुन घ्या. कोरोना केसेस कमी असल्या तरीही मी तुम्हाला आठवण करुन देत आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं ओबामा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I just tested positive for COVID. I’ve had a scratchy throat for a couple days, but am feeling fine otherwise. Michelle and I are grateful to be vaccinated and boosted, and she has tested negative.
It’s a reminder to get vaccinated if you haven’t already, even as cases go down.
— Barack Obama (@BarackObama) March 13, 2022
( हेही वाचा: अखेर काँग्रेसचे ठरलेच! अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब )
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, जानेवारीच्या मध्यात दररोज सरासरी 8 लाख 10 हजार केसेसच्या तुलनेत यूएसमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. मार्चच्या मध्यात दररोज सरासरी 35 हजार कोरोना रुग्ण सापडत होते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, युनायटेड स्टेट्समधील पाच आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांपैकी 80 टक्क्यांहून अधिक लोकांना COVID-19 लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community