सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता; अमेरिकेच्या माजी मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पाॅम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत दावा केला आहे. या दाव्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पाॅम्पीओ यांनी केला असल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

माजी परराष्ट्र मंत्री माईक पाॅम्पीओ यांनी त्यांच्या नेव्हर गिव्ह एन इंच: फायटिंग फाॅर द अमेरिका आय लव्ह (Never Give An Inch: Fighting for the America I Love) या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. माईक यांनी पुस्तकात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले. पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. माईक यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार असल्याची माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. त्यांनी सांगितले की, 27-28 फेब्रुवारी 2019 मध्ये ही घटना घडली. तेव्हा ते अमेरिका- उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोईला गेले होते. यानंतर त्यांच्या टीमने नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली होती.

( हेही वाचा: Pune Bhima River: धक्कादायक; ‘त्या’ सात जणांची आत्महत्या नव्हे ‘हत्या’च; 4 जणांना अटक )

याबाबत जग अनभिज्ञ

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील यु्द्ध अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचल्याच्या बाबतीत जग पूर्णत: अनभिज्ञ होते. मला नाही वाटत की, कोणालाही याबाबत काहीही माहित होते. दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. याच पार्श्वभूमीवर भारताने बालाकोट सर्जिकट स्ट्राईक करत दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here