माणगाव – रायगड रस्त्यावर अपघात;बस 10 ते 15 फूट खाली कोसळली,10 प्रवासी जखमी

115

माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणा-या बसला अपघात झाल्याची घटना घडली. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळळी आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ते प्रवासी किल्ले रायगडावर गेले होते. परतत असताना बसला हा अपघात झाला आहे. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरु आहेत.

या बसमधील सर्व प्रवासी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला आले होते. त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीनजीक या बसचा अपघात झाला. यावेळी, अवघड वळणावर बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली सुमारे 10 ते 15 फूट कोसळली. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: ‘आधार कार्ड’ संंबंधी सरकारने केला ‘हा’ नवा नियम )

माणगाव हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु

या बसमध्ये पालकांबरोबर त्यांची मुलेही होती. हे सगळे रायगडच्या सहलीसाठी आले होते. रायगडची सहल करुन हे प्रवासी परत जात होते. परतीचा प्रवास सुरु असताना, बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यावरुन 15 ते 20 फूट खाली दरीमध्ये कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सध्या अपघातातील सर्व जखमी प्रवाशांवर पाचाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने माणगावच्या सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.