दिवसाढवळ्या मुंबईत खारफुटींवर भराव

वांद्रे येथील कलानगर परिसरानजीकच्या धारावीला लागून असलेल्या खारफुटींवर सोमवारी सकाळी दिवसाढवळ्या भराव टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या कांदळवनांतर्गत राखीव क्षेत्रात हा प्रकार झाल्याने टेहाळणी पथकाने चार आरोपींना पकडले आहे.

(हेही वाचा – गणेशोत्सवासाठी ‘कोकण रेल्वे’कडून दिवा-सावंतवाडी विशेष गाडी धावणार!)

धारावीतील ३५ हेक्टर जागा २०१९ साली अधिसूचनेच्या माध्यमातून राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केले गेले. धारावीतील नंदादीप उद्यानामागील मिठी नदीतील खारफुटींवर १६ ते १७ गुंठे जागेवर भराव टाकला जात होता. रविवारपासून या भागांत भराव टाकला जात असल्याचे वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या पाहणीत दिसून आले. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ट्रकसह चार आरोपींना वनाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. पाण्यात भराव टाकताना तीन डंपर आणि एक जेसीपीसह चार आरोपींना वनाधिका-यांनी ताब्यात घेतले आहे.

खारफुटीच्या बाजूलाच ब्रीज बांधण्याचे काम सुरु आहे. त्यातूनच खारफुटींवरही अतिक्रमण झाल्याचा संशय वनाधिका-यांनी व्यक्त केला. याबाबत तपासणीअंती स्पष्ट बोलता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी आरोपींना न्यालालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली आहे.

आरोपींची नावे 

सोनू नाबिक (२९), मोहन कांबळे (३०), विद्यासागर निशाद (३९), मकसूद टाडंगुडी (४२)

कारवाईचे पथक 

ही कारवाई कांदळवन कक्षाचे विभागीय वनाधिकारी आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम, मध्य मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल भगवान मोडवे, कृष्णा पोले, रामदास राक्षे, संतोष गजभरे, वनरक्षक ए.जे.रायबन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here