कोकणात सापडल्या चार गुहा; विविध पक्ष्यांच्या प्रजातीही आढळल्या,परिसराचा केला अभ्यास

143

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला राॅक्स परिसरात संशोधकांनी चार गुहा शोधल्या असून, त्यापैकी बर्न्ट आयलॅंडवरील पाखोली ढोल नावाच्या एकाच गुहेपर्यंत त्यांना पोहचता आले. या गुहेत कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतुर, रातकीडा, ख्रिसमस ट्री वर्म्स, सिल्व्हफिश आणि बरनॅकल्स इत्यादी प्रजातींसह पाकोळी, कबुतरे आणि मार्टिन हे तीन पक्षी त्यांना आढळले.

मॅनग्रोव्ह अॅन्ड मरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने वेंगुर्ला राॅक्सचा अभ्यास प्रकल्प हाती घेतला आहे. जानेवारी ते जून 2020 या कालावधीत सलीम अली सेंटर फाॅर ऑर्निथोलाॅजी अॅन्ड नॅचरल हिस्टरी या संस्थेतील संशोधक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा कावळकर्ते यांनी वेंगुर्ला राॅक्स परिसराचा अभ्यास केला आहे.

काय आढळले संशोधकांना

भारतीय पाकोळ्यांची घरटी पाकोळी गुहेत असून त्यांची संख्या बरीच आहे. गुहेत 4 हजार 700 पक्ष्यांची घरटी आहेत. संशोधकांनी स्थानिक शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांनी स्थानिकांना या गुहांच्या संवर्धनाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.