मुंबईतील नामांकित कंपनीत रासायनिक गळती; चारजण जखमी

वरळी येथील प्रसिद्ध सस्मिरा इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन अॅण्ड टेक्सटाईल कंपनीत रासायनिक द्रव्याची गळती झाल्याने चार जण भाजले आहेत. या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरकडून दिली असली तरीही एक रुग्ण 72% भाजला असल्याने डॉक्टरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; १८ नोव्हेंबरला ईडीकडून पुन्हा चौकशी)

काय आहे नेमकी घटना –

वरळी येथील सस्मिरा इन्स्टि्युट ऑफ डिझाईन अॅण्ड टेक्सटाईल कंपनीत ग्लिसरीन सदृश्य द्रव्याची गळती झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण भाजले असून यात दोन महिला तर दोन पुरुषाचा समावेश आहे. चौघांनाही नजीकच्या जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची रवानगी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये करण्यात आली. चार रुग्णांपैकी प्रतीक्षा घुमे ही वीस वर्षीय महिला 72 % भाजली असल्याचे सेंटरच्यावतीने सांगण्यात आले. श्रद्धा शिंदे ही 27 वर्षीय महिला 40% भाजली आहे. तर प्रज्योत वडे हा 21 वर्षीय तरुण 19% तर राजीव कुलकर्णी हे 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक 19% भाजले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here