पुण्यातील धरणात बुडून ९ शाळकरी मुलांचा मृत्यू

पुण्यातील एका शाळेतील विद्यार्थी चासकमान धरणाजवळ गेले असताना, कडक उन्हाळा असल्यामुळे ही मुले धरणात पोहण्यासाठी उतरली यादरम्यान काही मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि 9 मुले धरणात बुडाली. कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कूलची ही मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिली माहिती

हा धक्कादायक प्रकार गुरूवारी घडला, संबंधित घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यावर पोलिसांसह, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही मुले या धरणाजवळ का गेली होती याबाबत अद्याप काही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here