अवंतीपोरा चकमकीत अंबरीन भटच्या मारेकऱ्यांना कंठस्नान

86

जम्मू-काश्मिरातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांनी 4 जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ठार झालेल्यांमध्ये टीव्ही कलाकार अंबरीन भटच्या 2 मारेकऱ्यांचाही समावेश आहे. बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावात 25 मे रोजी या दहशतवाद्यांनी अमरीनचा खून केला होता. या हल्ल्यात अबंरीन भटचा 10 वर्षीय भाचाही गंभीर जखमी झाला होता.

( हेही वाचा: छत्रपती संभाजी राजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार; पत्रकार परिषदेत घोषणा )

चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्थान

अंबरीन भटच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, काश्मीरमधील अवंतीपुरा येथे दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केले असून त्यामध्ये अमरीन भटची हत्या करणाऱ्या दोघांचा समावेश आहे. अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये झालेल्या दोन्ही चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आता त्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या स्लीपर सेलचा घेत आहेत. अंबरीनची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सर्व ठिकाणांहून दहशतवाद्यांची गुप्त माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हे दोन्ही दहशतवादी अवंतीपोरा भागात लपून बसल्याचं निष्पन्न झाले. सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.