आरडीएक्ससह पकडलेले चार दहशतवादी नांदेडमध्ये मुक्कामी होते! 

132

हरियाणा येथे बब्बर खालसा या संघटनेचे चार दहशतवादी यांना पकडण्यात आले. या सर्व दहशतवाद्यांनी आरडीएक्स भारतातील काही राज्यांपर्यंत पोहचवल्याची माहिती समोर आले. हे सर्व दहशतवादी नांदेडमध्ये मुक्कामी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांच्या पकडलेले

बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरविंदरसिंघ रिंदा पाकिस्तानात राहून नांदेड जिल्ह्यात दहशत माजवतो. पाकिस्तानातून तो ड्रोनच्या साह्याने शस्त्रे पाठवतो. त्याने स्फोटके आणि पाठविलेली शस्त्रे घेऊन त्याचे साथीदार गुरुप्रित, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर हे नांदेडकडे वाहनातून येत असताना कर्नाल पोलिसांनी त्यांना पकडले. रोबोटद्वारे त्यांची गाडीची झडती घेऊन शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेनंतर नांदेड शहर व जिल्ह्यात रिंदाशी संबंधित असलेल्या अनेकांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यातच पकडलेले हे आरोपी मार्च महिन्यात नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ३० मार्च ते २ एप्रिलपर्यंत हे चारही दहशतवादी नांदेडमध्ये होते. त्यानंतर बिदरमार्गे ते पुढे गाेव्याला गेले असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दुजाेरा दिला आहे. त्यामुळे हे दहशतवादी हरियाणात जाण्यापूर्वी नांदेडात नेमके कशासाठी थांबले होते? याचा तपास पोलीस करीत आहेत.

(हेही वाचा मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.