आरोग्यसेविकांचे आंदोलन मागे

प्रातिनिधीक फोटो

पगारवाढीसह कंत्राटी नियुक्तीच्या मुद्यावर लढणा-या मुंबईतील चार हजार आरोग्यसेविकांनी अखेर सोमवारी सायंकाळी बेमुदत आंदोलन मागे घेतले. गेल्या सहा दिवसांपासून त्या बेमुदत संपावर होत्या. मात्र दोन हजार पगारवाढीवर लेखी शिक्कामोर्तब होताच आरोग्यसेविकांनी आंदोलन मागे घेतले.

( हेही वाचा : ‘घोडेबाजार’ शब्दाचा अर्थ आहे तरी काय?)

आंदोलन मागे

गेल्या आठवड्याभरापासून आरोग्यसेविकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित कोणत्याही कामांत सहभाग घेतला नाही. परिणामी किशोरवयीन वयोगटातील लसीकरणाची माहिती आरोग्य सेविकांकडून शासनाला मिळालेली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यांत पावसाळी अधिवेशनासाठी आरोग्य सेविकांचे दरवर्षाला होणा-या प्रशिक्षण कार्यक्रमाचा घाटही यंदा रद्द झाला. कंत्राटीपद्धतीवरुन पालिकेवर संतापलेल्या आरोग्य सेविकांच्या प्रतिनिधींसोबत पालिका प्रशासनाचीही आठवडाभर बैठक सुरु होती. कामाचे आठ तास नियुक्तीत नसल्याने कायमस्वरुपी नियुक्तीला तांत्रिक मर्यादा असल्याची माहिती पालिकेने आरोग्यसेविकांना दिली. त्यामुळे कंत्राटीकरणाव्यतिरिक्त इतर मागण्यांवर पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका स्वीकारल्याबद्दल आरोग्यसेविकांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, तांत्रिक सेवा खंड न देणे, वेंडोर पद्धत रद्द करणे या विषयावर ३ जुलैपर्यंत पालिका प्रशासनाकडून चर्चा अपेक्षित असल्याची डेडलाईन महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड प्रकाश देवदास यांनी दिली. त्या अटीवरच आंदोलन मागे घेतल्याची माहिती अॅड देवदास यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here