तब्बल ४ हजार लीटर केमिकलयुक्त दूध जप्त! गुजरातमधून दोघांना अटक

154

अन्न आणि औषध प्रशासनाकडून देशभरात धडक कारवाया सुरू असताना आता गुजरातमध्ये मोठी कारवाई कऱण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईमध्ये तब्बल ४ हजार लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे. दुधात केमिकलची भेसळ केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून भेसळयुक्त दुधाचा बाजार सुरू होता. अखेर त्यांचा पर्दाफाश करण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला यश आले आहे. गुजरात राज्यातील राजकोटमध्ये खाद्य विभागाने पोलिसांच्या मदतीने ४ हजार लीटर भेसळयु्क्त दूध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी एक दुधाचा ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी त्यांची शंका येताच त्यांना अडवण्यात आले आणि त्यांची चैकशी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत दूध टँकरमध्ये असणाऱ्या दूधात भेसळ करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासातून उघड झाले आहे.

(हेही वाचा – जॅकलीनच्या अडचणीत वाढ! 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी ED कडून आरोपत्र दाखल)

गेल्या चार महिन्यांपासून दुधात भेसळ केली जात असल्याचे दोन्ही आरोपींनी सांगितले. शिवाय ज्या फॅक्टरीत ही भेसळ केली जाते, तिचा पत्ताही पोलिसांना मिळाला आहे. या फॅक्टरीत केमिकल्स दुधात मिसळले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या ठिकाणी आढळून आलेल्या दुधाचे सॅम्पल्स चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून आता अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.