रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म सॅन फ्रान्सिस्को येथे २६ मार्च १८७४ रोजी झाला. शिक्षक आणि पत्रकार विल्यम प्रेस्कॉट फ्रॉस्ट जूनियर हे त्यांचे वडील होते आणि आईचे नाव इसाबेल मूडी असे होते. त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर, फ्रॉस्ट मॅसॅच्युसेट्समध्ये त्यांच्या आजोबांकडे आले, जिथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. लेखक म्हणून फ्रॉस्ट (Robert Frost) यांची ओळख प्रादेशिक किंवा ग्रामीण भाषेतील लेखक म्हणून झाली असली, तरी त्यांचे पालनपोषण शहरात झाले आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणेच फ्रॉस्ट यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. मात्र पुढे ते लेखनाकडे वळले.
(हेही वाचा – Mumbai Crime : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून १लाखात विकले, चार महिलांना अटक)
त्यांच्या नाटकांतील संवाद जिवंत झाले
अमेरिकन समीक्षक रँडल जरेल फ्रॉस्टच्या लेखनाबद्दल म्हणतात, “फ्रॉस्ट हे विसाव्या शतकातील महान अमेरिकन कवी होते. ते महान जीवनमूल्ये असलेले लेखक होते. सामान्य माणसाचे जीवन त्यांनी ज्या पद्धतीने सहजतेने मांडले, ते इतर लेखकांसाठी अवघड काम होते. त्यांच्या भाषेचा प्रवाह इतका सुरळीत होता की, त्यांच्या नाटकांतील संवाद जिवंत झाले.” रँडल यांची स्तुती वाचून आपल्या लक्षात येतं की, फ्रॉस्ट हे प्रचंड ताकदीचे महान कवी होते.
चार वेळा पुलित्झर पारितोषिक
ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण आणि अमेरिकन मातृभाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांना साहित्यविश्वात मोठा मान मिळाला. ते अमेरिकन बोली भाषेत लिहायचे, त्यामुळे ते वाचकांना जवळचे वाटायचे. मात्र त्यांची कलाकृती अमेरिकेत प्रकाशित होण्यापूर्वी इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली होती. विसाव्या शतकातील लोकप्रिय आणि समीक्षकांच्या दृष्टीने आदरणीय कवी म्हणून त्यांची गणना होते. फ्रॉस्ट यांना त्यांच्या लेखनासाठी अनेक सन्मान मिळाले. कविता लेखनासाठी फ्रॉस्ट यांना चार वेळा पुलित्झर पारितोषिक (Pulitzer Prize) मिळाले आहे.
व्हरमाँटचा कवी पुरस्कार घोषित
विशेष म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्ट यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी ३१ वेळा नामांकन मिळाले होते. म्हणून जून १९२२ मध्ये, लीग ऑफ वुमन क्लब ऑफ व्हरमाँटने फ्रॉस्ट यांना व्हरमाँटचा कवी पुरस्कार देण्याची घोषणा केली. यास न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीयमध्ये विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र २२ जुलै १९६१ रोजी, राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाद्वारे फ्रॉस्ट यांना व्हरमाँटचा कवी पुरस्कार घोषित करण्यात आले. (Robert Frost)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community