Foxconn Vedanta Deal : फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला

185
Foxconn Vedanta Deal : फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला

विरोधी पक्षाकडून मागील काही महिन्यांपासून राज्यातील मोठे उद्योग गुजरातकडे वळवल्याचा आरोप होत होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप सुरु असतांनाच फॉक्सकॉनने वेदांतासोबतच (Foxconn Vedanta Deal) करार मोडला आहे. त्यामुळे मोठ्या कंपनीमधील गुंतवणूक या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

नेमका प्रकार काय?

गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्यांनी १९.५ अब्ज डॉरचा करार केला होता. या करारांतर्गत वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी मिळून गुजरात, भारतामध्ये तब्बल १९.५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि प्रदर्शन उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती.

(हेही वाचा – कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर होणार सुनावणी)

मात्र आता तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीने वेदांतासोबतचा करार रद्द केला आहे. हा करार मोडीत निघाल्याने वेदांतलाच झटका बसला नाही, तर सरकारच्या या योजनेलाही धक्का बसला आहे. या कराराच्या माध्यमातून सरकारला भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे होते, मात्र आता हा करार रद्द झाल्याने भारताचे हे स्वप्न काहीसे कठीण होऊन बसले आहे.

या विषयातील तज्ञांकडून हा करार तुटण्याचे आधीच अंदाज बांधले जात होते. याचे कारण म्हणजे तैवानची कंपनी फॉक्सकॉनने नवीन पार्टनर शोधण्यास सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात एका ईडीच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली होती. ज्यामध्ये वेदांत आणि फॉक्सकॉनमध्ये मतभेद असल्याचे सांगितले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.