दुबईहून निकाराग्वाला जाणाऱ्या विमानाला फ्रान्सने जप्त (France Seizes Plane) केले आहे. यामध्ये तब्बल ३०३ प्रवासी अडकले आहेत. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार “फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे की दुबईहून निकाराग्वाला जाणाऱ्या विमानात ३०३ भारतीय होते. काही तांत्रिक बिघाडामुळे विमान फ्रान्सच्या विमानतळावर थांबवण्यात आल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले. मात्र, दूतावासाचे पथक सध्या विमानतळावर पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.”
(हेही वाचा – Swami Shraddhanand : हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ तळमळीने राबवणारे स्वामी श्रद्धानंद)
‘या’ कारणामुळे विमान जप्त –
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, फ्रान्सला (France Seizes Plane) मानवी तस्करीचा संशय आल्याने भारतीय प्रवाशांनी भरलेले विमान थांबवण्यात आले. तथापि, भारतीय दूतावासाचे पथक तेथे पोहोचले आणि दूतावासात प्रवेश मिळवला. संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
पोलिसांनी विमानतळावर लोकांना रोखले –
तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून फ्रान्सने विमान (France Seizes Plane) लहान व्हॅट्री विमानतळावर उतरवले. प्रवाशांना विमानात थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले. यानंतर लोकांना विश्रामगृहात थांबवून प्रतीक्षालयात हलवण्यात आले. यानंतर सर्वांना विश्रांतीसाठी बेड देण्यात आला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी विमानतळावर लोकांना रोखले आणि ती जागा सील केली, असा दावा अनेक माध्यमांनी केला. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. (France Seizes Plane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community