SBI Fraud: स्टेट बॅक ऑफ इंडियाची मागच्या पाच वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची फसवणूक

111

भारतीय स्टेट बॅंकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रुपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या कोरोना काळातील असून, सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महत्वाचे म्हणजे SBI च्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.

( हेही वाचा: भारतात तीन पैकी एका महिलेवर नव-याकडून होतोय लैंगिक किंवा शारिरीक अत्याचार; धक्कादायक माहिती उघड )

अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बॅंकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे.

घोटाळ्यात बॅंकेतील कर्माचा-यांचाच समावेश

स्टेट बॅंकेच्या या महाघोटाळ्यात बॅंकेतीलच 610 कर्मचा-यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक 175 कर्माचा-यांचा सहभाग 2018 मध्ये होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.