सावधान! व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला भुलू नका!

173

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर असलेले ‘स्टेट्स’ बघून समोरच्या व्यक्तीमत्त्वावर भूलण्याच्या आधी सावध व्हा. अशा व्यक्ती आपली फसवणूक देखील करू शकतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आर्मीचा वेश परिधान करून स्वतःचा फोटो ठेवला होता. आपण आर्मीत अधिकारी असल्याचे सांगत तरुणाना नोकरीचे अमिष दाखवत तो त्यांची फसवणूक करीत होता.

पैसे उकळून फसवणूक

प्रतीक आल्हाट असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रतीक हा मूळचा पुणे येथे राहणारा आहे. प्रतीक हा बेरोजगार तरुणांना गाठून त्यांना नोकरीचे आमिष देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत होता. प्रतीकने स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवर आर्मीचे कपडे परिधान केलेला फोटो ठेवला होता. स्वतःला आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत त्याची ओळख भरपूर असून चांगल्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगून तो तरुणांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करीत होता. गुन्हे शाखा कक्ष १ कडे आलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी त्याला सायन येथून नुकतीच अटक केली आहे.

( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )

राज्याच्या विविध जिल्ह्यातील तरुणाकडून त्याने नोकरीच्या नावाखाली पैसे उकळले होते, उस्मानाबाद येथील अहमद शेख याची त्याने या प्रकारे फसवणूक केली होती. अहमद शेख याने त्याच्यकडे पैसे परत मागितले असता मी सैन्यात असून तुला त्रास होऊ शकतो अशी धमकी त्याने शेख याला दिली होती. अब्दुल सत्तार याला देखील त्याने चालकाची नोकरी लावतो असे सांगून त्याच्याकडून २८ हजार रुपये उकळले होते. अटक करण्यात आलेला आरोपी प्रतीक आल्हाट याने स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवर आर्मीचा फोटो लावल्यामुळे आम्ही त्याला फसलो, तो खरोखरच आर्मीमध्ये असल्याचे वाटल्याने आम्ही त्याला पैसे दिले होते असे फसवणूक झालेल्या अनेक तरुणाचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.