मुंबई पोर्ट ट्रस्ट नावाने बनावट वेबसाईट, नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची लूट

154

मुंबई पोर्ट ट्रस्टची बनावट वेबसाईट बनवून नोकर भरतीच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार एका सतर्क नागरिकामुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यानी तात्काळ दखल घेऊन एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून बनावट बेवसाईड बंद करण्यासाठी सायबर विभागाची मदत घेऊन तपास सुरू केला आहे. यामध्ये बनावट वेबसाईटमुळे शेकडो जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यात वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – घाबरू नका..! सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन; राज ठाकरेंची कोपरखळी)

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याच्या मेलवर एका सतर्क नागरिकाने मेल करून मुंबई पोर्ट ट्रस्टची दुसरी पण वेबसाईट आहे का ? त्या वेबसाईटवर नोकर भरतीच्या नावाखाली पेटीएम मार्फत पैशांची मागणी केली जात आहे, असे विचारण्यात आले होते. सेम मेसेज निवृत्त अधिकारी यांनी पोर्ट ट्रस्टच्या दुसऱ्या अधिकाऱ्याला व्हाट्सअप्पवर केला होता. पोर्ट ट्रस्टचे माहिती सुरक्षा अधिकारी यांनी याबाबत खात्री केली असता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नावाने हुबेहूब एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आलेली होती, व त्या वेबसाईटवर नोकरभरती ची जाहिरात देऊन पेटीएमवर पैसे मागितले जात होते.

पोर्ट ट्रस्टचे माहिती सुरक्षा अधिकारी यांनी यांनी तात्काळ एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी प्रथम तक्रार दाखल करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सायबर पोलिसांची मदत घेऊन बनावट वेबसाईट गोठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही बनावट वेबसाईट केव्हा व कोणी बनवली याबाबत तपास सुरू असून या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सविस्तर तपास सुरू असून लवकरच या गुह्याचा उलगडा होईल अशी शक्यता पोलिसकडून वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.