पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगून गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांना तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे. पंकज गुल जगासिया (वय 43) यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. फसवणुकी प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (वय 70) व सनत ईश्वर परमार (वय 46) यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – नागपूरप्रमाणे नाशिकमध्ये ‘या’ मार्गावर होणार डबलडेकर उड्डाणपूल!)
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी कामगार पुतळा परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता. मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे कारण पंकज जगासिया यांना सांगितले. गुंतवणूक केल्यास जादा रक्कम मिळेल असे अमिष दाखवले आणि फसवणूक केली आहे.
आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडुन 1 कोटी 21 लाख रुपये घेतले. मात्र 2016 पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. यासंबधी पोलिस अधिक तपास करत आहेत. पुण्यातून वारंवार अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community