International Day of Yoga: नागपुरात योग दिनाला Free मेट्रो प्रवास

आंतरराष्ट्रीय योग दिनाला नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सकाळी 5.30 वाजता पासून विविध कार्यक्रमात व योग प्रात्यक्षिके सुरू आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी मंगळवारी निःशुल्क मेट्रो प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मैसूर कर्नाटक येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नागपूर येथून केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होते. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने निशुल्क विशेष मेट्रोसेवा सकाळी 4.45 वाजता खापरी आणि लोकमान्य नगर पासून कस्तुरचंद पार्क वरील जागतिक योगा दिनाच्या कार्यक्रमासाठी दिली होती. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी Free मेट्रो प्रवास देण्यात आला होता.

(हेही वाचा – International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस असा होणार साजरा)

21 जून रोजी सकाळी 6 ते 6.40 कार्यक्रमाचे आयोजन केले असून सकाळी 7 ते 7.45 योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करण्यात आली आहे. यावर्षी योग दिवसासाठी ‘योगा फार ह्युमॅनिटी’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी 5.30 वाजता पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने केंद्रीय आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here