जी.पी पिल्लई (G P_Pillai) यांचा जन्म २ फेब्रुवारी १८६४ रोजी पल्लीपुरम, त्रिवेंद्रम येथे एका नायर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिहरन अय्यर आणि आईचे नाव कार्तयानी अम्मा असे होते. सुरुवातीच्या काळात त्रिवेंद्रम युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते विविध वृत्तपत्रांत स्तंभ लेखन करायचे व भ्रष्टाचार आणि ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात आवाज उठवायचे.
मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर १८९८ मध्ये त्यांना लंडनमधील मिडल टेंपलमध्ये दाखल करण्यात आले. १९०२ मध्ये त्यांना त्रावणकोर हायकोर्टच्या बारमध्ये बोलावण्यात आले. जी.पी. पिल्लई (G P Pillai) हे केरळमधील कॉंग्रेस संघटनेचे सर्वात पहिले नेते होते आणि त्यांनी दोनदा सरचिटणीस म्हणून काम केले होते.
(हेही वाचा Weather Update : देशासह राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता तर विदर्भासाठी ‘ऑरेंज अलर्ट जारी)
त्यांनी मद्रास स्टँडर्ड या प्रसिद्ध नियतकालिकाचे संपादकपद भूषविले आहे आणि त्रावणकोर राज्यातील नागरी हक्कांसाठी त्यांनी लढा दिला आहे. ते एक उत्कृष्ट लेखक आणि वक्ता होते. ब्रिटनमध्ये तसेच भारतामध्ये त्यांचा मोठा संपर्क होता. महात्मा गांधींनी यांनी आपल्या आत्मचरित्रात पिल्लई यांचा उल्लेख करुन त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी आभार देखील मानले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला. २१ मे १९०३ मध्ये त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community