कवितांतून ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणारे स्वातंत्र्यसैनिक Garimella Satyanarayana

128
कवितांतून ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणारे स्वातंत्र्यसैनिक Garimella Satyanarayana
कवितांतून ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणारे स्वातंत्र्यसैनिक Garimella Satyanarayana

गरिमेल्ला सत्यनारायण (Garimella Satyanarayana) यांचा जन्म १४ जुलै १८९३ साली आंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुलम येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव व्यंकटनरसिंह असं होतं. तर आईचं नाव सुराम्मा असं होतं. गरिमेल्ला सत्यनारायण (Garimella Satyanarayana) हे एक कवी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते आपल्या कवितांद्वारे ब्रिटिश सरकारच्या विरोधात जनजागृती करायचे. त्यासाठी गरिमेल्ला सत्यनारायण (Garimella Satyanarayana) यांना ब्रिटिश सरकारने कित्येक वेळा तुरुंगात टाकलं होतं.

गरिमेल्ला सत्यनारायण (Garimella Satyanarayana) यांना खरी ओळख त्यांच्या ‘आम्हांला या पांढऱ्या नियमांची गरज नाही’ या ब्रिटिशांविरुद्ध लिहिलेल्या गाण्यामुळे मिळाली. हे गाणं भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान आंध्रप्रदेशातल्या प्रत्येक घरात लोकप्रिय होतं.

(हेही वाचा- ‘NASA’च्या माजी अंतराळवीराकडून भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले…)

सत्यनारायण यांना कन्नेपल्ली नरसिंह राव नावाच्या एका दयाळू वकिलाने शिक्षण घ्यायला आणि बी.ए. ची पदवी पूर्ण करायला मदत केली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सत्यनारायण यांनी गंजम जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून आणि विजयनगरम इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. (Garimella Satyanarayana)

पुढे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी सत्यनारायण यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं. आपल्या कवितांतून ब्रिटिशांविरुद्ध ते आवाज उठवायचे म्हणून त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. पण त्यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि आपल्या क्रांतिकार्याला सुरुवात केली. ते गावोगावी जाऊन ब्रिटिशांविरुद्ध गाणी गायचे. त्यासाठी त्यांना अडीच वर्षं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. (Garimella Satyanarayana)

(हेही वाचा- Maharashtra Rain : मुंबईत पावसाची काय स्थिती? कुठे मुसळधार? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?)

ते तुरुंगात असताना त्यांचं संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, वडील आणि आजोबा होते. सत्यनारायण यांनी कल्पक विलास नावाचं छोटं रेस्टॉरंट सुद्धा सुरू केलं. पण त्यानंतर त्यांनी कित्येक वर्षं गरीबीतच घालवली. १८ डिसेंबर १९५२ साली निराधार अवस्थेमध्ये त्यांना मरण आलं. (Garimella Satyanarayana)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.