वीरपांड्या कट्टबोम्मन (Veerapandiya Kattabomman) यांचा जन्म ३ जानेवारी १९६० रोजी तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील जगवीरा कट्टबोम्मन पंचलंकुरिचीचे सरदार होते आणि त्यांच्या आईचे नाव अरुमुगथम्मल असे होते. वयाच्या तिसाव्या वर्षी वारसा हक्क म्हणून वीरपांड्या देखील सरदार झाले. यास स्थानिक भाषेत पॉलीगार म्हणतात.
वीरपांड्या (Veerapandiya Kattabomman) यांनी कर गोळा करण्याचा आणि आपल्या कार्यक्षेत्रात सैनिकांची भरती करण्याचा अधिकार राखून ठेवला. मात्र ब्रिटीशांनी पॉलीगारांना बेकायदेशीर शासक म्हटले. आपल्याच देशात ते बेकायदेशीर ठरले. मग ब्रिटिशांनी नवी कर प्रणाली आणली. १७९८ मध्ये वीरपांड्या आणि तिरुनेनवेलीचा कलेक्टर जॅक्स यांच्यात करावरुन मतभेद झाले. तसेच ब्रिटिश सैन्य आणि पॉलिगार यांच्यात वाद झाल्यामुळे परिणामी डेप्युटी कमांडमेंटचा मृत्यू झाला.
पुढे ब्रिटिशांनी मेजर जॉन बॅनरमनच्या नेतृत्वाखाली शस्त्रत्र दल पाठवले. लढाई झाली, मात्र ब्रिटिशांच्या तोफांसमोर वीरपांड्या यांच्या सैनिकांका टिकाव लागला नाही आणि शेवटी त्यांना किल्ला सोडून जंगलात जावे लागले. त्यांनी गमिवी कावा या पद्धतीने आपला लढा सुरुच ठेवला. मात्र १ ऑक्टोबर १७९९ रोजी त्यांना पकडण्यात आले. १५ दिवस त्यांची चौकशी करण्यात आली आणि १६ ऑक्टोबर १७९९ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. आपल्या मातृभूमीसाठी ते हुतात्मा झाले.
Join Our WhatsApp Community